Minister Shivendrasinhraje welcoming two independent councillors after they extended support to the BJP in Satara.
Sakal
सातारा
Satara politics: साताऱ्यातील दोन अपक्षांचा भाजपला पाठिंबा; मंत्री शिवेंद्रसिंहराजेंकडून स्वागत, पालिकेतील संख्याबळ ४२ वर!
Maharashtra local Body Politics latest News: साताऱ्यात भाजपला दोन अपक्षांचा पाठिंबा, पालिकेतील संख्याबळ ४२ वर
सातारा : पालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या प्रभाग एकमधील शंकर किर्दत आणि प्रभाग सहामधील रविराज किर्दत यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा दिला. दोन अपक्षांनी पाठिंबा दिल्याने भाजपची सभागृहातील बळसंख्या सद्य:स्थितीत ४२ इतकी झाली आहे.

