'यांच्या'शी झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन केला घाेषित

उमेश बांबरे
मंगळवार, 14 जुलै 2020

सातारा जिल्ह्यात वर्तमानपत्रे आणि त्याचे वितरण सुरू राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वांना सकाळी सहा ते नऊ या वेळेत घरपोच वर्तमानपत्र मिळणार आहे; परंतु विक्रेत्यांनी स्वत:सह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वर्तमानपत्र हाताळणीतून कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. 

सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अखेर जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यानुसार, गुरुवारी (ता. 16) मध्यरात्री 12 वाजल्यापासून 22 जुलैपर्यंत सहा दिवस कडक लॉकडाउन होईल. या सहा दिवसांत अत्यावश्‍यक सेवा वगळता बाजारपेठेसह सर्व काही बंद राहील. ता. 23 ते 26 जुलैदरम्यान लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देत सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत दुकाने सुरू राहतील.
दुधाचे करायचे काय...ते मारताहेत टाहाे
 
सातारा जिल्ह्यात जुलैच्या सुरवातीपासून कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. दररोज 50 ते 70 बाधित सापडण्याची सरासरी कायम राहिली आहे. लोकांनी विनाकारण गर्दी करण्यास सुरुवात केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुरवातीला दुकानांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाचवरून सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत कमी केली, तरीही गर्दी कमी होण्याऐवजी वाढली. त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज (मंगळवार) सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये लॉकडाउन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

साताऱ्याच्या कंदी पेढ्यांविषयी उदयनराजे म्हणाले...

जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन सुरू होणार असून, 22 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत त्याची कडक अंमलबजावणी होईल. त्यानंतर ता. 23 ते 26 जुलैपर्यंत लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार असून, सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सर्व दुकाने व खासगी अस्थापना सुरू राहतील. 

लॉकडाउन... 
ता. 17 ते 22 जुलै : अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व बंद 
ता. 23 ते 26 जुलै : सकाळी नऊ ते दुपारी दोनदरम्यान सर्व दुकाने व खासगी अस्थापना सुरू 

होम क्वारंटाइनच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा केल्याने या गावचा सरपंच अडचणीत 

हे बंद राहणार... 

 •  किराणा दुकाने, किरकोळ, ठोक विक्रेते व व्यवसाय (ता. 17 ते 22 जुलै) 
 •  उपहारगृहे, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल 
 •  वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू दुकाने 
 •  खाद्यपदार्थांची ऑनलाइन घरपोच सेवा 
 •  सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, वॉक 
 •  केश कर्तनालये, सलून, ब्युटी पार्लर 
 •  सर्व प्रकारचे विक्रेते, आठवडा बाजार, दैनंदिन बाजार, फेरीवाले 
 •  मटन, चिकण, अंडी, मासे 
 •  शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग 
 •  सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने, दोन चाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने 
 •  चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृहे, करमणूक केंद्र, प्रेक्षागृह 
 •  मंगल कार्यालये, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ 
 •  सर्व प्रकारची खासगी कार्यालये, ई कॉमर्स सेवा 
 •  सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम 
 •  धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे 

सातारा : पोलिस कर्मचाऱ्यांचा झाला भ्रमनिरास; कशामुळे वाचाच

हे सुरू राहणार... 

 •  दूध विक्री, घरपोच दूध वितरण (सकाळी सहा ते दहा) 
 •  सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा 
 •  सर्व रुग्णालये व निगडित सेवा 
 •  मेडिकल दुकाने (सकाळी नऊ ते दोन) 
 •  हॉस्पिटलशी संलग्न मेडिकल दुकाने (24 तास) 
 •  न्यायालये, शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये 
 •  पेट्रोल पंप व गॅस पंप (सकाळी नऊ ते सायंकाळी सहा) (अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांसाठी) 
 •  घरपोच गॅस वितरण, रेशन दुकाने 
 •  निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक 
 •  औद्योगिक व अत्यावश्‍यक वस्तू पुरवठा करणारी वाहने 
 •  पाणीपुरवठा करणारे टॅंकर 
 •  सर्व बॅंका, सोसायटी, एलआयसी कार्यालये (सकाळी नऊ ते दोन) 
 •  एमआयडीसीतील व खासगी उद्योग 
 •  शेती व दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन कामे 
 •  कृषी सेवा, बी- बियाणे, खते, किटकनाशके, चारा दुकाने (सकाळी नऊ ते दोन) 

Coronavirus : विश्‍वासार्हतेमुळे वृत्तपत्रांनाच वाचकांची पसंती

प्राणीप्रेमींनाे तुम्हीही हे नक्की करा

संपूर्ण जिल्ह्यात वर्तमानपत्रे सुरू राहणार 

सातारा जिल्ह्यात वर्तमानपत्रे आणि त्याचे वितरण सुरू राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वांना सकाळी सहा ते नऊ या वेळेत घरपोच वर्तमानपत्र मिळणार आहे; परंतु विक्रेत्यांनी स्वत:सह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वर्तमानपत्र हाताळणीतून कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. 

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढलेला संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास जिल्हावासियांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे. सुरवातीच्या सहा दिवसांच्या बंद काळात सर्वांनी घरीच थांबावे व स्वत:ची काळजी घ्यावी. 

- शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा 

संपादन - सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Collector Shekhar Singh Declared Lockdown In Satara District