जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार
Updated on

सातारा :  कोरोना विषाणू संसर्गात अधिक वाढ होवू नये यासाठी सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी केंद्र शासनाने विकसित केलेल्या आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन त्याचा 100 टक्के वापर करावा, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, बँका, पतसंस्था, बाजार समित्या, शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये, इतर सर्व खासगी प्रकारच्या कार्यालयांमध्ये व त्यांच्या अधिनिस्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही आरोग्य सेतू ॲप मोबाईवर डाऊनलोड करुन दैनंदिन वापर करावा. 

तसेच हे ॲप अद्यावतही करावे. दैनंदिन कार्यालयीन कामकाजासाठी येणारे अभ्यांगत, नागरिकांना केंद्र शासनाने विकसित केलेल्या आरोग्य सेतू ॲप मोबाईलवर डाऊनलोड करण्याचे सूचित करावे. समाजाच्या सामाजिक आरोग्याचा विचार करुन व प्रवेश करणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक आरोग्याचा विचार करुन आरोग्य सेतू ॲपचा वापर न करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश देण्यात येवू नये. 

या कामासाठी कार्यालय प्रमुखाने प्रवेशद्वारावर कर्मचारी वर्गाची रोटेशन पद्धतीने नेमणूक करावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ओदशात नमुद केले आहे.

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलबाबत झेडपीने घेतला माेठा निर्णय

दहावीनंतर काय? विनामुल्य वेबिनारचे आयोजन
 
पैसे परत मिळण्याचा त्यांचा हक्कच : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com