सातारा जिल्ह्यात प्रशासनास उभारावी लागली आणखी एक स्मशानभूमी

सचिन शिंदे
Sunday, 6 September 2020

हा वाढता ताण पालिका कर्मचाऱ्यांना पेलावत नव्हता. या महिन्यात तीन तारखेपर्यंत 13 तर चार सप्टेंबरला 13 कोरोनाग्रस्तांवर येथे अत्यंसंस्कार झाले. त्याचा परिणाम पालिका कर्मचाऱ्यांच्या मानसिकता व शरीरावर होत होता. परंतु आता विभाजनाने तो ताण हलका होण्यास हातभार लागणार आहे.
 

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधीत रूग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्काराची जबाबदारी एकट्या कऱ्हाड पालिकेवर होती. मात्र कोरोनाग्रस्तांच्या मृतांची वाढती संख्या लक्षात घेवून कऱ्हाड पालिकेबरोबर मलकापूरवरही अंत्यसंस्काराची जबाबदारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश देवून निश्चीत केली आहे.
कऱ्हाडला अडीचशे कोविड योद्धे कोरोनाच्या कचाट्यात

कोविडची साथ सुरू झाल्यानंतर तालुक्यासह कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर कऱ्हाडच्या कोविड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार एप्रिल ते आॅगस्ट अखेर तब्बल 200 पेक्षा अधिक मृतांवर कऱ्हाडच्या कोविड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्यासाठी पालिकेने स्वतंत्र कोविड स्मशानभूमी बांधली. तेथे आरोग्य विभागाचे कर्मचारी दहन देतात. कऱ्हाड तालुक्यात आॅगस्ट महिन्यात कोरोनाचा कहर वाढला. त्या महिन्यात तब्बल 126 कोरोनाग्रस्त मृतांवर कोविड स्मशानभूमीत अत्यंसंस्कार झाले. त्याचा पालिका कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आला.

पॉस मशिनमुळे कोरोना संसर्गाचा धोका, रेशनिंग दुकानदार धास्तावले
 
ती गोष्ट लक्षात घेवून कऱ्हाडचे नगरसेवक, नागरीकातून कोविड स्मशानभूमीचे विभाजनाची मागणी करत होते. मलकापूरला अंत्यसंस्काराची जबाबदारी देण्याची मागणी होती. अंत्यसंस्काराचा पालिका कर्मचाऱ्यांवर वाढता ताण व कोविड स्मशानभूमी विभाजनाची मागणी जिल्हाधिकारी सिंह यांनी नुकतीच मान्य केली.

सातारकरांनो, मला माफ करा.. मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवलीय

त्यांनी तालुक्यात दुसऱ्या कोविड स्मशानभूमीस मंजूरी दिली. कऱ्हाड तालुक्यातील काले, येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत व कृष्णा हाॅस्पीटलमध्ये उपचार घेणारा कोरोनाचा रूग्ण दगावल्यास त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्याची जबाबदारी मलकापूर पालिकेवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी नारायणवाडी येथे कोविड स्मशानभूमी बांधली जाणार आहे. काले प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत 15 तर येवतीतंर्गत 14 गावे आहेत. त्या गावांसह मलकापूर व कृष्णा हाॅस्पीटल येथे उपचार घेणारा रुग्ण दगावल्यास त्यांच्यावर नारायणवाडी येथे अत्यंसंस्कार होणार आहेत. मलकापूर पालिकेने नारायणवाडी येथे त्वरीत कोविड स्मशानभूमी तयार करावी, असेही आदेशात आहे.

संजय राऊत कंगनाची माफी मागणार?, राऊतांनी केलं मोठं विधान

कर्मचाऱ्यांवरील ताण होणार हलका

कोविडचा कहर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याबरोबरच मृत्यूचा दर वाढल्याचे दिसते. एप्रिलपासून आॅगस्ट अखेर मृत्यूचा दर 66 टक्क्यांनी वाढला होता. एप्रिलला दोन, मे सहा, जूनमध्ये 14, जुलैमध्ये 30 तर आॅगस्टमध्ये तब्बल 126 कोरोनाग्रस्तांवर पालिका कर्मचाऱ्यांनी अत्यंसंस्कार केले आहेत. हा वाढता ताण पालिका कर्मचाऱ्यांना पेलावत नव्हता.

साताऱ्यात कोरोनाचा कहर; पाच महिन्यांत मृत्यूंमध्ये 66 पटीने वाढ 

या महिन्यात तीन तारखेपर्यंत 13 तर चार सप्टेंबरला 13 कोरोनाग्रस्तांवर येथे अत्यंसंस्कार झाले. त्याचा परिणाम पालिका कर्मचाऱ्यांच्या मानसिकता व शरीरावर होत होता. परंतु आता विभाजनाने तो ताण हलका होण्यास हातभार लागणार आहे.

सातारकरांनो.. ऑक्‍सिजनची कमतरता भासतेय, मग आम्हाला फोन करा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Collector Shekhar Singh Orders Malkapur Municipal Council For Funeral Of Covid 19 Patients