साताऱ्याचे जिल्हाधिकारी बनले कठाेर, अखेर 'हा' निर्णय घेतलाच

प्रवीण जाधव
Thursday, 30 July 2020

अखेरीस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर याबाबत गाऱ्हाणे मांडले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांचा अहवाल तयार करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांना दिले होते.

सातारा : कोरोना संसर्गाच्या बिकट काळात कामात हजर न राहणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील चार डॉक्‍टरांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत. खासगी डॉक्‍टर्सही मदतीला आलेले आहेत.
फेसबुक मैत्रिणीसाठी सोडला नवरा

या परिस्थितीतही काही वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी कोरोना संसर्गापूर्वीपासून, तसेच काही कोरोना संसर्ग जिल्ह्यात सुरू झाल्यापासून कामावर हजर राहात नव्हते. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांतून समोर येत होती; परंतु जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाकडून ठोस पावले उचलली जात नव्हती. 

अखेरीस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर याबाबत गाऱ्हाणे मांडले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांचा अहवाल तयार करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांना दिले होते. या डॉक्‍टरांबाबतचा अहवाल नुकताच जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. विशाल जाधव, डॉ. प्रज्ञा भोसले- जाधव, डॉ. अर्चना खाडे व डॉ. उज्ज्वला नाईक या चारही डॉक्‍टरांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

व्वा! 98 वर्षांच्या आजोबांनी त्याला हरवलेच! 

तब्बल 24 वर्षांनी दिली दहावीची परीक्षा 

कास धरणावर असे वागू नका

राष्ट्रवादीच्या नेत्याची 'या' निवडणुकीतून माघार

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Collector Shekhar Singh Orders Suspension Of Four Doctors

Tags
टॉपिकस
Topic Tags: