
तारळे : जे दोन वेळा पराभूत झाले, ते मतदारसंघात पुन्हा दिसलेत का? आता निवडणुका असल्याने ते पुन्हा फिरताना दिसतील. त्यामुळे अशांपासून सावध राहा. आपल्या पाठीशी राहणाऱ्या, विकासकामे करणाऱ्या प्रतिनिधीला निवडून देण्याचे कर्तव्य करा, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्कमंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
येथे ९ कोटी ३५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, बबनराव शिंदे, अभिजित पाटील, संजय देशमुख, सोमनाथ खामकर, विजय पवार, गजानन जाधव, रणजित शिंदे, माणिक पवार, नामदेवराव साळुंखे, विकासराव जाधव, एम. डी. जाधव, श्रीकांत सोनावले, युवराज नलवडे, उपसरपंच सुधा पवेकर, किशोर बारटक्के, बाळासाहेब सूर्यवंशी, रवींद्र सपकाळ, किरण सूर्यवंशी, रत्नदीप जाधव, अमोल घाडगे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. येत्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा आणि सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विभागात जिल्हा परिषद, पंचायत समितीला नेमका कशाचा फेरा येतो, हे कळेना. शंभूराजांची माणसे पडली, तरी विकासकामे सोडली नाहीत. खारीक, खोबरं, गुलालाला लोक भाळतात. निवडणुकीपुरते १५ दिवस येणाऱ्यांना ओळखा.’
प्रत्येक आरोपाचे उत्तर देऊ...
विरोधक पाठीमागून आरोप करताहेत. मात्र, त्यांना आव्हान आहे. पाठीमागे बोलण्यापेक्षा समोरासमोर व्यासपीठावर या, तुमच्या प्रत्येक आरोपाचे, प्रश्नाचे उत्तर देऊ, असे सांगत मंत्री देसाई यांनी आम्ही शिवसेना सोडली नसून शिवसेनेतच आहोत, असा पुनरुच्चार केला.