सहकार पॅनेलचे उमेदवार विजयी होणार; बाळासाहेब पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकार पॅनेलचे उमेदवार विजयी होणार;  बाळासाहेब पाटील

सहकार पॅनेलचे उमेदवार विजयी होणार; बाळासाहेब पाटील

कऱ्हाड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दहा जागांसाठी आज मतदान झाले. त्याच दहा जागी सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताने विजय होतील, असा दावा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला.

हेही वाचा: संयुक्त किसान मोर्च्याकडून PM मोदींना खुलं पत्र; केल्या सहा मागण्या

जिल्हा बॅंकेच्या कऱ्हाड सोसायटी गटात उमेदवार असलेल्या सहकारमंत्री पाटील यांनी दुपारी तीननंतर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा बँकेसाठी आज सकाळपासून उत्साहात मतदान सुरू होते. तीन वाजेपर्यंतच ९० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. पाच वाजेपर्यंत १०० टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा होती. बॅंकेच्या २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित दहा जागीही सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील.’’

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

जावळी मतदारसंघात झालेल्या वादाबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, ‘‘जावळीमध्ये सकाळी किरकोळ वाद झाला. मात्र, तो वाद मिटला असून ज्यांनी वाद केला, ते दोघे दुपारनंतर एकत्र फिरत होते.’’

loading image
go to top