Satara Cooperative Bank Election : आमदार जयकुमार गोरेंचा पाठिंबा कोणाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार जयकुमार गोरेंचा पाठिंबा कोणाला?

आमदार जयकुमार गोरेंचा पाठिंबा कोणाला?

दहिवडी : जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माण सोसायटी मतदारसंघ लक्षवेधी ठरला असून आमदार जयकुमार गोरे यांनी बंधू शेखर गोरे की राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना पाठिंबा दिला, याबद्दल उत्सुकता शिगेला पोचली आहे. या मतदारसंघात १०० टक्के मतदान झाले.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

विद्यमान संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्हा बॅंक निवडणुकीत माघार घेतल्यानंतर माण सोसायटी मतदारसंघात अचानक ट्विस्ट निर्माण झाला होता. आमदारांच्या माघारीमुळे राष्ट्रवादीचे मनोज पोळ व शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यात सरळ सामना रंगला होता. दोघांनीही आपल्या परीने प्रचार केला होता. त्यातही शेखर गोरे यांनी आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबवली होती. तरीसुध्दा विजयी होण्याइतपत संख्याबळ मिळविण्यात दोघेही यशस्वी ठरले नव्हते. त्यामुळे आमदार जयकुमार गोरे व बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेले अनिल देसाई यांच्या मतांवर या दोघांचीही भिस्त आहे. विशेषत: आमदार गोरे काय करणार, यावर विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार, हे ठरणार आहे.

हेही वाचा: संयुक्त किसान मोर्च्याकडून PM मोदींना खुलं पत्र; केल्या सहा मागण्या

येथील महात्मा गांधी विद्यालयात जिल्हा बँक निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. एकूण ७४ मतदारांपैकी सर्व ७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या दिवशी आज सकाळच्या सत्रात साधारण २० मतदारांनी मतदान केले होते. त्यात बहुतांश राष्ट्रवादी समर्थक होते. त्यानंतर शेखर गोरे यांच्या मतदारांनी दोन आराम बसमधून येऊन एक गठ्ठा मतदान केले. त्यानंतर सर्वांना प्रतीक्षा होती, ती आमदार जयकुमार गोरे व त्यांचे समर्थक मतदार हे दुपारी साडेतीनपर्यंत मतदान केंद्राकडे फिरकले नव्हते. साधारण चार वाजण्याच्या सुमारास आमदार गोरे हे समर्थक मतदारांना घेऊन केंद्रावर आले. या सर्वांनी रांगेत जावून मतदान केले.

दरम्यान, मतदान केंद्रावर शेखर गोरे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्यात नियमांच्या कारणावरून किरकोळ शाब्दिक चकमक झाली. पण, काही वेळातच त्यावर पडदा पडला. मतदान झाल्यानंतर मतदार तसेच नेतेमंडळी, समर्थक हे येथील फलटण चौकातील हॉटेलमध्ये एकत्र येऊन हास्यविनोदात दंग झाले होते. त्यामुळे तणाव जावून वातावरण हलकेफुलके राहण्यास मदत होत होती.

डॉ. नानासाहेब शिंदेंची करामत

पानवण सोसायटीचा ठराव ज्यांच्या नावावर आहे व ज्यांच्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची पोलिस यंत्रणा कामाला लागली होती, ज्यांच्यामुळे शेखर गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता, त्या डॉ. नानासाहेब शिंदे यांनी आज शेखर गोरे यांच्यासोबतच येऊन मतदान करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

loading image
go to top