esakal | धक्‍कादायक... पाचगणीच्या रुग्णालयातून बाधित युवतीचे पलायन

बोलून बातमी शोधा

कोरोना

पाचगणी येथील बेल एअर कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेली कोरोना बाधित युवती आज सकाळी रुग्णालयातून अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.

धक्‍कादायक... पाचगणीच्या रुग्णालयातून बाधित युवतीचे पलायन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिलार (जि. सातारा) : पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण चेंबूर (मुंबई) येथून उपचारासाठी आला होता; परंतु उपचारापूर्वीच्या तपासणीत या रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू झाले. त्यानंतर त्यांच्या निकटच्या सहवासित 23 वर्षीय मुलीच्या घशातील स्त्रावाचे नमुने 24 जूनला पुण्याला पाठवण्यात आले. त्याचाही अहवाल दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह आल्याने तिलाही बेल ऐअरमधीलच कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. 

तेथे सर्व उपचार व्यवस्थित सुरू असताना अचानक ही युवती आज पहाटे साडेपाचच्या सुमारास कोरोना केअर सेंटरमधून गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. 

रुग्णालय प्रशासनाने तिचा शोध घेतला; परंतु ती सापडत नसल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. पाचगणी पोलिस संबंधित बाधित युवतीचा शोध घेत आहेत. 
 

नवदांपत्याच्‍या संसार प्रवासात ‘कोरोना’चा थांबा...