चिंताजनक! कऱ्हाडात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; आरोग्य विभागाकडून जोरदार हालचाली

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on: 

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचे लोण आता शहरातून पोहचू लागल्याचे दिसत आहे. शहरात एकाच दिवसात पूर्वी दोन चारवर असणारी संख्या आज एकाच दिवशी पंधरावर पोहचली आहे. त्यामुळे शहरातही आता कोरोनाचा धोका वाढत चालल्याचे दिसत आहे. तालुक्यातही दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरासह तालुक्याची चिंता वाढू लागली आहे.  

कोरोनाचा मध्यंतरी कमी झालेला प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्बंध जारी केले आहेत. मात्र, तरीही अनेकजण बेफिकीरीने वागत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेकजण अजूनही विनामास्क फिरताना दिसत आहे. त्याचबरोबर अनेकांना पहिल्यासारखी या प्रादुर्भावाची काळजीही वाढत नाही. त्यामुळे बिनधास्तपणे सर्वजण वागत आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून सध्या कोरोनाचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. एकीकडे लसीकरण सुरु असतानाही शहरासह तालुक्यात बाधीतांची संख्या वाढत आहे. 

दिलासादायक! साताऱ्यात 212 गावांनी कोरोनाला वेशीबाहेरच रोखलं; पाटण तालुका आघाडीवर

आठवड्यापूर्वी घारेवाडीत एकाचवेळी 15 जण बाधीत आढळले होते. त्यानंतर ते गाव प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या आदेशावरुन प्रशासनाने आठवड्यासाठी सील केले होते. शहरासह तालुक्यात आजच आणखी 22 कोरोना बाधीतांची भर पडली. त्यामध्ये शहरातील गुरुवार पेठेतील तीन, शनिवार पेठेतील चार आणि शहरातील अन्य आठ असे पंधरा रुग्ण आहेत. तर तालुक्यातील मलकापूरजवळील कोयना वसाहतमध्ये तीन, तळबीड, पार्ले, हिंगनोळे, नांदलापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. एकाच दिवशी 22 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची चिंता वाढली आहे.  

कऱ्हाड शहरासह तालुक्यात वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेवून सर्वांनी स्वतःसाठी तरी आवश्यक ती काळजी घेवून जबाबदारीने वागले पाहिजे. त्याचा तुमच्या कुटुंबाला फायदा होणार आहे. त्याचा विचार करुन सर्वांनी खबरदारी घ्यावी.

-उत्तम दिघे, प्रांताधिकारी, कऱ्हाड   

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

women hockey gold medal
udaysinh patil undalkar
Sangli District Bank Election
Panchayat Samiti members discuss drought conditions and irrigation issues in Walwa taluka
Marathi News Esakal
www.esakal.com