कोडोलीत लोकसहभागातून कोरोना विलगीकरण कक्ष

Satara
Satara
Updated on

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव धक्कादायक असून, कऱ्हाड तालुक्‍यातील रुग्णालयांमध्ये बेड कमी पडू लागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कोडोलीने लोकसहभागातून विलगीकरण कक्ष सुरू करत जिल्ह्यातील इतर गावांपुढे आदर्श ठेवला आहे. गावामध्ये कोरोना रुग्ण सापडल्यास त्याची तपासणी करून गरज असल्यास घरातच विलगीकरणात उपचार करण्यात येणार आहेत. उपचारासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा गावातील सार्वजनिक मंडळे, दानशूर व्यक्ती करत आहेत. 

कोरोनाची कोणतीही लक्षणे नसणारे पॉझिटिव्ह रुग्ण किंव्हा त्यांच्या निकटवर्तीयांना "होम आयसोलेशन' म्हणजे घरीच उपचार घ्यायला डॉक्‍टर सांगत आहेत; पण ग्रामीण भागात प्रत्येक घरी दोन बाथरूम, स्वतंत्र खोल्या, पूर्णपणे वेगळी सोय आदी सोयीसुविधा नसतात. लोकवस्ती दाटीवाटीची असते व सुविधा नसल्यामुळे घरातील इतर लोक व शेजाऱ्यांना कोरोना संक्रमण होण्याची शक्‍यता अधिक वाढते. या समस्येवर मात करण्यासाठी कोडोलीतील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. लोकवर्गणीतून गावात "होम आयसोलेशन'ची संस्थात्मक सोय केलेली आहे.

गणेश मंडळ व ग्रामस्थांनी त्यासाठी साहित्य जमा केले आहे. त्यामध्ये पल्स ऑक्‍सिमीटर, थर्मल गन, नेबुलायझर, स्टिमर मशिन, पाणी गरम करण्यासाठी इंडक्‍शन कुकर, गाद्या, ब्लॅंकेट, मास्क, जेवणाचे डबे, पीपीई किटस इत्यादींचा समावेश आहे. ज्यांच्या घरी सुविधा आहे, त्यांना त्यांच्या घरीच लागेल ते साहित्य पुरवले जाणार आहे. ज्यांच्या घरी व्यवस्था नाही त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित सोय अशी केली जाणार आहे. या उपक्रमामध्ये ही सर्व यंत्रणा उभी करताना वडगाव हवेलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्जेराव घोलप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 


गावातील सर्व घटकांचा सहभाग 

लोकसहभागातील विलगीकरण कक्ष या उपक्रमात डॉ. विजय जगताप आणि सहायक आयकर आयुक्त डॉ. जगदीश जगताप यांचाही सक्रिय सहभाग आहे. सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, आरोग्य सेविका, आशाताई, अंगणवाडी सेविका, विक्रम थोरात, कोरोना दक्षता समिती व सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतलेला आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com