

Martyrs remembered, trees planted, and society inspired at Satara wedding
sakal
कऱ्हाड : इतिहासाचे स्मरण, हुतात्म्यांना वंदन, संविधानिक मूल्यांचा सन्मान, आणि वृक्षारोपनातुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत छत्रपती शाहु विचारांचे अभ्यासक अॅड. संभाजीराव मोहिते यांचे चिरंजीव लेफ्टनंट कमांडर हर्षवर्धन मोहिते आणि सुनिल पाटील यांच्या कन्या प्रियांका हिच्याशी बलवडी (ता. पलूस, जि.सांगली) येथील क्रांती स्मृतीवनात पार पडला. आजच्या दिखाऊपणाच्या आणि खर्चिक लग्नसमारंभांच्या युगात, एका नवदाम्पत्याने समाजासमोर अनुकरणीय आदर्श ठेवला आहे.