esakal | Satara: कोरोना केअर सेंटर्सची संख्या घटली
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना विषाणूचे प्रतिकात्मक छायाचित्र

साताऱ्यात कोरोना केअर सेंटर्सची संख्या घटली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने कोरोना केअर सेंटरची (सीसीसी) संख्याही कमी करण्यात आली आहे. सातारा, जावळी, माण, खटाव, कऱ्हाड, फलटण, महाबळेश्‍वर या तालुक्यांत आता केवळ सात सीसीसी कार्यरत ठेवण्यात आल्‍या असून, प्रत्येक सीसीसीमध्ये बाधितांची संख्याही अल्प प्रमाणात आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू झाल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्या दरम्यान, सरकारी व खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोना केअर सेंटर सुरू केले होते. यामध्ये बाधित रुग्ण, संशयित रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून उपचारासाठी सुविधा दिल्या जातात.

हेही वाचा: पिंपरीत नऊ फुटी अजगराला जीवदान

ऑक्‍टोबर ते जानेवारी या कालावधीत रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रित आल्याने २६ कोरोना सेंटरपैकी केवळ एका ठिकाणी सेंटर सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून अचानक रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. कोरोनाची दुसरी लाट ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. सप्टेंबर महिन्यापासून बाधितांची संख्या राज्यभरात आटोक्यात आली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील

बाधित संख्येचा आढावा घेऊन सीसीसी संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात बाधित संख्येचा पॉझिटिव्‍हिटी रेट कमी झाल्याने सीसीसीची संख्या कमी करून केवळ सात ठिकाणी सुरू ठेवण्यात आली आहेत. याचबरोबर, पुढील काही दिवसांत बांधित संख्या व पॉझिटिव्‍हिटी रेटचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

-डॉ. सचिन पाटील, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी

loading image
go to top