सातारा : बिजवडीतील गावांना जिहे-कटापूरचं पाणी आरक्षित करण्यासाठी संघर्ष उभारू

लवकरच टेंडर निघून ते पाणी आंधळी धरणात येईल
प्रभाकर देशमुख
प्रभाकर देशमुखsakal

बिजवडी : जिहे कटापूर सिंचन योजनेचे पाणी सहा महिन्यात उत्तर माण परिसरात आणणार अशा खोट्या गर्जना करत निवडणूका लढवणारे अडीच वर्षे झाली तरी पाणी आणू शकले नाहीत.पाणीप्रश्न हा माणखटावच्या जीवणमरणाचा प्रश्न आहे.टेंभूचे पाणी आरक्षित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे.जिहे कटापूरच्या योजनेतंर्गत उपलब्ध होणारे पाणी आणण्याच्या बोगद्याचे कामही अंतीम टप्प्यात आलेय.लवकरच टेंडर निघून ते पाणी आंधळी धरणात येईल.बिजवडी परिसरातील गावे या योजनेत आरक्षित नसले तरी नवीन पाणी लवादावेळी या गावांनाही जिहेकटापूरचे पाणी आरक्षित करण्यासाठी आम्ही प्रसंगी सरकारविरोधात संघर्ष उभारत या भागाला पाणी देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी केले आहे.

बिजवडी ता.माण येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी प्रजोत भोसले , व्हा.चेअरमन बापूराव दडस यांच्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सातारा जि.बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई ,महानंद दूध डेअरीचे डी.के.पवार ,सिध्दनाथ पतसंस्थेचे चेअरमन सुनिल पोळ ,कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम.के.भोसले ,माजी सभापती पै.संदीप मांडवे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासो सावंत , नगरसेवक महेश जाधव ,सुरेंद्र मोरे ,मार्केट कमिटीचे संचालक योगेश भोसले ,शिवकृपाचे संचालक पंढरीनाथ भोसले ,राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष प्रशांत विरकर ,गोंदवलेचे सरपंच जयप्रकाश कट्टे ,राजवडी चे चेअरमन विजूशेठ भोसले ,शिवाजीराव भोसले ,आनंदराव विरकर ,सोसायटीचे सर्व संचालक ,बिजवडी परिसरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

प्रभाकर देशमुख म्हणाले ,जिहे कटापूरच्या कामाच्या टेंडरसाठी काहीजण उपोषणाच्या वल्गना करत आहेत.त्यांच्या वल्गनामुळे नाहीतर या भागातील जनतेला आधर देत त्यांचे संसार उभे करण्यासाठी लवकरच या कामाचे टेंडर निघून काम सुरू होणार आहे.टेंडर अडवून काम बंद पाडण्याचे काम राष्ट्रवादी कधीच करत नाही.बिजवडी परिसरातील गावांना पाणी आरक्षित करण्यासाठी व याचा सर्वे करण्यासंदर्भात जलसंधारण मंत्री ना.जयंत पाटील यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झालीय.लवकरच पाणी वाटपासाठी नवीन लवाद होतोय.त्या वाटपात हा प्रस्ताव मंजूर करून घेऊ असे त्यांनी सांगितले आहे.राजकरणाच्या पलिकडे जावून आम्ही पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही रोजगार मेळावे घेत अनेकांना रोजगार मिळवून दिला.मात्र नोकऱ्या लावण्यासाठी कधी लोकप्रतिनीधींनी पुढाकार घेतला नाही.कारण त्यांना आंधळी प्रकरणासारखी फक्त लोकांची डोकी फोडायचीत.त्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे सर्वसामान्य युवकांवर गुन्हे दाखल झालेत.असले उद्योग आम्ही कधीच करत नाही.

सातारा जिल्हा बँक ही देशातली अग्रगण्य बँक असून सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकरी , बेरोजगारांना आर्थिक आधार देण्याचे काम जि.बँक करत आहे.व्यवसाय ,उद्योगधंदे उभारणीसाठी मदत करत जि.बँक सोसायट्यांच्या माध्यमातून तरूणांना दिशा देण्याचे काम करत आहे. सोसायटीच्या सभासदांनी पदाधिकाऱ्यांवरती विश्वास टाकत काम करण्याची संधी दिलीय ती सार्थकी लावत सभासदांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा.चांगल्या उत्पन्नासाठी व दरासाठी एकात्मिक शेती फायदेशीर ठरणार असून यासाठी शेतकऱ्यांनी समूह करत गटशेती करणे गरजेचे आहे.शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे.जेष्ठ पत्रकार बापूराव गुंजवटे दादांनी डाळींबीची चांगली बाग जोपासली आहे.त्यांचा आदर्श घेत इतरांनीही गटशेतीच्या माध्यमातून फळबागा कराव्यात.गटशेतीसाठी बँक , सोसायटीच्या माध्यमातून मार्गदर्शनही केले जाईल असेही ते म्हणाले.

अनिल देसाई म्हणाले ,विकास सेवा सोसायटीची मातृसंस्था जिल्हा बँक आहे.जि.बँकेच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत याचा लाभ घ्यावा.सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या माध्यमातून गावचा विकास साधावा.टँक्स टू मँक्स या योजनेतंर्गत एक कोटीचे व्यवसायासाठी एक टक्का व्याजदराने कर्ज मिळते.जि.बँकेच्या माध्यमातून पाऊसाळ्यात फळबागा वाचवण्यासाठी क्रॉप कव्हर टाकण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जात आहे.

दिड लाख रूपये एकरी कर्ज दिले जात आहे.मराठा समाजाच्या मुलांना उद्योग ,व्यवसायासाठी १५ लाख रूपये बिनव्याजी कर्ज दिले जात आहे.इतर समाजातील मुलांनाही दहा लाख रूपये बिनव्याजी कर्ज दिले जात आहे.या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

डी.के.पवार म्हणाले ,माणमधील अनेक लोकांनी प्रशासकीय सेवेत काम केलेय.शेतकऱ्यांना दहापंधरा दिवसाला पैसे देणारा दूधाचा चांगला धंदा आहे.दूधाला चांगला दर आहे शेतकऱ्यांचा प्रपंच दूध व्यवसायावर चालतोय.इतर शेतकऱ्यांनीही शेतीला जोडधंदा म्हणून दूधाचा व्यवसाय करावा.

यावेळी संजय भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक हणमंतराव भोसले सर यांनी केले. सूत्रसंचालन अमोल काटकर यांना करून उपस्थितांचे आभार सोसायटीचे चेअरमन प्रजोत भोसले यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com