बिजवडीत बोर्डला धडकून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

विशाल गुंजवटे
Wednesday, 20 January 2021

बिजवडी येथे बॉंबे रेस्टॉरंटनजीक वळणावरील रस्त्याच्या बाजूच्या दिशादर्शक बोर्डच्या अँगलला धडकून दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

बिजवडी (जि. सातारा) : येथे बॉंबे रेस्टॉरंटनजीक वळणावरील रस्त्याच्या बाजूच्या दिशादर्शक बोर्डच्या अँगलला धडकून दुचाकीस्वार पांडुरंग मारुती पवार (वय 55 रा. करजकी, ता. जत, जि. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पांडुरंग मारुती पवार हे फलटणहून अंबवडे (ता. खटाव) दुचाकीवरून निघाले होते. बिजवडीनजीक बॉंबे रेस्टॉरंटनजीक वळणावरील रस्त्याच्या कडेला एक सार्वजनिक बांधकाम विभागाचा दिशादर्शक बोर्ड आहे. भरधाव वेगामुळे वळणावर गाडीचा ताबा सुटल्याने दुचाकीस्वाराची त्या बोर्डाच्या अँगलला जोरदार धडक बसली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. पी. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राक्षे करत आहेत. 

पिलीव घाटात सातारा-पंढरपूर बसवर दगडफेक; दरोड्याच्या अफवेने सातारा-सोलापूर पोलिसांची पळापळ

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News Accident On Bombay Restaurant Road At Bijwadi