
गोडोली परिसरात एक 36 वर्षीय महिला राहण्यास आहे. त्या महिलेची फेसबुकच्या माध्यमातून जयदीप गणपत खर्डे (रा. रायपूर) याच्याशी ओळख झाली. ओळखीनंतर जयदीपने त्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवले.
सातारा : फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर रायपूर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील जयदीप गणपत खर्डे (वय 35) याने साताऱ्यातील एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाचे आमिष दाखवत खर्डे याने त्या महिलेकडून सव्वापाच लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने याची तक्रार काल रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली असून, खर्डे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोडोली परिसरात एक 36 वर्षीय महिला राहण्यास आहे. त्या महिलेची फेसबुकच्या माध्यमातून जयदीप गणपत खर्डे (रा. रायपूर) याच्याशी ओळख झाली. ओळखीनंतर जयदीपने त्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवले. आमिष दाखवल्यानंतर ता. 5 जून 2018 ते ता. 16 ऑक्टोबर 2019 या काळात जयदीपने वेगवेगळी कारणे सांगत त्या महिलेकडून 5 लाख 19 हजार रुपये उकळले. यानंतर त्या महिलेने जयदीपच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावला.
पंधरा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी वनरक्षक एसबीच्या जाळ्यात
मात्र, तो प्रत्येकवेळी वेगवेगळी उत्तरे देत असे. याच काळात जयदीपचे पहिले एक लग्न झाल्याचे त्या महिलेस समजले. जयदीपने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने पैशाची मागणी त्याच्याकडे केली. मात्र, जयदीपने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे त्या महिलेने जयदीप खर्डे याच्याविरोधात काल रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. याचा तपास सहायक निरीक्षक मोरे करीत आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे