नागेवाडीत बैलगाडी शर्यतीच्या आयोजनप्रकरणी लिंबच्या तिघांवर गुन्हा; 5 लाखांचे साहित्य जप्त

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : नागेवाडी (ता. सातारा) येथील माळावर बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी लिंब येथील तिघांवर सातारा तालुक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांकडून सुमारे 5 लाखांची चारचाकी वाहने, बैलगाडी व इतर साहित्य जप्त केले आहे. 

नागेवाडी येथील माळावर आज सकाळी अकराच्या सुमारास बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती काही जणांनी पोलिस नियंत्रण कक्षास दिली. यानंतर त्याबाबतच्या कारवाईचे आदेश सातारा तालुका पोलिसांना देण्यात आले. यानुसार त्याठिकाणी जात सातारा तालुका पोलिसांनी मारुती महादेव सावंत, विष्णू गुलाबराव सावंत, तानाजी आनंदराव सावंत (सर्व रा. लिंब) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे असणारे दोन टेंपो, एक बैल, शर्यतीची बैलगाडी असा सुमारे पाच लाखांचे साहित्य जप्त केले आहे. याची तक्रार सहायक फौजदार आय्याज बागवान यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदविली असून, तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is MIDC expanding in Satara?
Koyna Dam latest water storage update
Eknath Shinde on Rahul Gandhi protest
Koyna Dam water level today
Marathi News Esakal
www.esakal.com