बाबो! हणबरवाडीत चोरट्याने पळवले चिंचेचे झाड; उंब्रज पोलिस ठाण्यात मालकाची तक्रार

गजानन गिरी
Thursday, 18 February 2021

हणबरवाडी ग्रामपंचायत हद्दीत शासनाकडून मंजूर झालेले घरकुल आहे. त्याच्या उत्तरेकडे खुल्या जागेत चिंचेचे मोठे जुने झाड होते.

मसूर (जि. सातारा) : हणबरवाडी येथील खुल्या जागेतील 15 हजार रुपयाचे चिंचेचे मोठे झाड चोरून नेल्याच्या तक्रार दिली असताना त्याची दखल घेतली जात नाही, असे निवेदन विजय फडतरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, वनविभाग व उंब्रज पोलिसांना त्यांनी हे निवेदन दिले आहे. 

श्री. फडतरे यांनी निवेदनात म्हटले आहे, की हणबरवाडी ग्रामपंचायत हद्दीत शासनाकडून मंजूर झालेले घरकुल आहे. त्याच्या उत्तरेकडे खुल्या जागेत चिंचेचे मोठे जुने झाड होते. ते काही दिवसांपूर्वी लाकडाच्या व्यापाऱ्यांनी भर दिवसा तोडले. संबंधितांनी त्याची दांडगाव्याने परस्पर विल्हेवाट लावली आहे. वन विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आपली मागणी आहे. मात्र, तेथे कसलीच कारवाई होत नाही. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News Complaint Of Theft Of Large Tamarind Tree At Hanbarwadi