अवैधरित्या वाळू चोरली अन् पोलिसांनी 'त्यांची' चांगलीच जिरवली; आठ जणांवर गुन्हा

अवैधरित्या वाळू चोरली अन् पोलिसांनी 'त्यांची' चांगलीच जिरवली; आठ जणांवर गुन्हा

वडूज (जि. सातारा) : सिद्धेश्‍वर कुरोली-वरुड (ता. खटाव) रस्त्यावर अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर वडूज पोलिसांनी कारवाई करून आठ जणांवर गुन्हा दाखल केला. सिद्धेश्‍वर कुरोली ते वरुड रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावांमध्ये आठ ते दहा जण वाळू उपसा करीत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली. 

श्री. देशमुख यांनी तत्काळ आपल्या अन्य पोलिस कर्मचाऱ्यांसह खासगी वाहनाने त्याठिकाणी जाऊन छापा मारला. त्याठिकाणी तीन ट्रॅक्‍टर व आठ जण अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. यातील दोन ट्रॅक्‍टर व तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, इतर पाच जण व एक ट्रॅक्‍टर घेऊन फरारी झाले आहेत. यातील दोन ट्रॅक्‍टर व दोन ब्रास वाळू जप्त करून पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. 

याबाबत संतोष लक्ष्मण मदने, सुनील बसाप्पा देणेकनेबर, शशिकांत निवृत्ती निंबाळकर (सर्व रा. सिद्धेश्वर कुरोली) यांना ताब्यात घेतले आहे. सुमित पृथ्वीराज देशमुख, विश्‍वनाथ बसाप्पा वाठारकर, गणेश वसंत पाटोळे, यश दुर्योधन शिरकुळे, गणेश (पूर्ण नाव समजू शकले नाही) हे फरारी झाले आहेत. दोन ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह व दोन ब्रास वाळू असा एकूण दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com