Crime News : मराठा महासंघाच्या 'युवक'च्या प्रदेश उपाध्यक्षांच्या गाडीवर गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News : मराठा महासंघाच्या 'युवक'च्या प्रदेश उपाध्यक्षांच्या गाडीवर गोळीबार

शिरवळ : मोर्वे ( ता . खंडाळा )येथील दत्तमंदीराचे दर्शन घेऊन लोणंद कडे जात असताना मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कोंडे -देशमुख यांच्या चारचाकी गाडीवर गोळीबार केला त्यास प्रतित्युतर म्हणुन कोंडे यांच्या सुरक्षारक्षकांनी ही फायर केले . हा गोळीबारचा थरार आज मंगळवारी दुपारी मोर्वे -वाघोशी रस्त्यावरील भादे हद्दीत घडाला . खंडाळा ' शिरवळ व लोणंद पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली . सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

याबाबत माहिती अशी कि , मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कोंडे देशमुख हे वीर (ता . पुरंदर जि.पुणे ) येथील नाथमंदीर व मोर्वे ( ता.खंडाळा ) येथील दत्तमंदीराचे दर्शन घेऊन मोर्वे वाघोशी रस्त्यावरून लोणंदकडे आपल्या चारचाकी वाहनातुन (गाडी क्रमांक एमएच - 12 . युजी - 999 ) जात असताना .... येणाऱ्या मोटारसायकल वरून पाठिमागुन येणाऱ्या दोघांनी फायर केले त्यास प्रतितयुत्तर म्हणुन कोंडे - देशमुख यांच्या सुरक्षारक्षकाने ही गोळीबार केला . या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही . मात्र चारचाकी वाहनावर दोन गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले . तेथे पुंगळी ही आढळून आले .

दरम्यान घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडेखंडाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे, लोणंद चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर ' एलसीबी रमेश गरजे सह पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.

मोर्वे वाघोशी रोडवरील खिंड उतरताना हा प्रकार घडाला . वाहनांची वर्दळ नसणाऱ्या हा भाग , नेहमी मनुष्यविरहीत असतो . अशा शांत असणाऱ्या भागात हा गोळीबार झाल्याने जीवीतहानी करण्याचा बेत नेमका कोणाचा? याचा तपास पोलीस करीत आहे.

टॅग्स :Satarapolicecrime