esakal | पाटण तालुक्‍यात अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने शेतात ओढून नेऊन अत्याचार; बिबीतील एकास दहा वर्षांची शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

पाटण तालुक्‍यातील अल्पवयीन मुलीस एकटी पाहून तिला जबरदस्तीने शेतात ओढत नेले. तेथे तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला.

पाटण तालुक्‍यात अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने शेतात ओढून नेऊन अत्याचार; बिबीतील एकास दहा वर्षांची शिक्षा

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील अल्पवयीन मुलीला दोन वर्षांपूर्वी मारहाण करून अत्याचार करणाऱ्यास अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी दहा वर्षांच्या सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दिनेश मोहन पवार (रा. बिबी, ता. पाटण, सध्या रा. सुपने) असे त्याचे नाव आहे. परिस्थितीजन्य पुरावे व सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 
सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्‍यातील अल्पवयीन मुलीस एकटी पाहून तिला जबरदस्तीने शेतात ओढत नेले. तेथे तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीला घरी गेल्यावर त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी तिला कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. मुलीवर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळले. 

साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढला कडक निर्बंधाचा आदेश; जाणून घ्या काय सुरु, काय बंद..

पोलिसांनी दिनेश पवार विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. तत्कालीन पाटण पोलिस निरीक्षक डी. डी. पाटील यांनी तपास केला. जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी 10 साक्षीदार तपासले. साक्षी, सरकारी युक्तिवादासह परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानून शिक्षा ठोठावली. 

बातमी कामाची! घरबसल्या जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवाल?; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढला कडक निर्बंधाचा आदेश; जाणून घ्या काय सुरु, काय बंद..

मलकापुरात कडक निर्बंध! विनामास्क फिरणाऱ्या 22, तर सामाजिक अंतर न पाळणाऱ्या 15 दुकानदारांवर कारवाई

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image