esakal | हनी ट्रॅपचा दूसरा प्रकार उघडकीस; पशुखाद्य व्यापाऱ्याकडून उकळले दोन लाख
sakal

बोलून बातमी शोधा

money

पशुखाद्य व्यापाऱ्याकडून उकळले दोन लाख; एकास अटक

sakal_logo
By
किरण बाेळे

फलटण शहर (जि. सातारा) : हनी ट्रॅपद्वारे (honey trap) एका भेंडी व्यापाऱ्याकडून 15 लाख 50 हजार रुपयांची खंडणी (ransom) उकळल्याचे प्रकरण ताजे असतानाच यातील संशयित राजू बोके व त्याच्या अन्य चार साथीदारांनी हनी ट्रॅपद्वारे एका पशुखाद्य व्यापाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी उकळल्याचा आणखी एक गुन्हा फलटण शहर पोलिस ठाण्यात (phaltan city police station) दाखल झाला आहे. (satara-crime-news-phaltan-police-arrested-one-honey-trap-case)

एका महिलेने 17 ऑगस्ट 2020 रोजी गोळी भुस्सा घेण्यासाठी दहा हजार रुपये ऍडव्हान्स द्यायचा आहे व तुमच्याशी बोलायचे आहे, या बहाण्याने एका पशुखाद्य व्यापाऱ्याचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर वारंवार त्या व्यापाऱ्याला फोन करून त्याच्याशी लगट करत त्यास महाराजा लॉज येथे नेले. लॉजमधील रुममध्ये नेताच तिने दरवाजा बंद करून बाथरुममध्ये जाऊन कोणाला तरी फोन केला. यानंतर काही वेळातच रुमच्या दरवाजा जोरजोरात वाजला. दरवाजा उघडताच राजू बोके व त्याचे चार साथीदार तेथे आले व त्यांनी व्यापाऱ्यास महाराजा लॉजच्या जिन्यातून खेचत व मारहाण करीत खाली आणले. यानंतर त्यास जबरदस्तीने कारमध्ये बसवले. या वेळी कारमध्ये त्या महिलेसह राजू बोके व त्याचे साथीदार बसले. व्यापाऱ्यास मारहाण करीत तुझ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार देतो, अशी धमकी देत दमदाटी करून त्याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली.

हेही वाचा: अब्रूची बेअब्रु होईल, भीतीने व्यापाऱ्याने मुलीस 15 लाख दिले

यानंतर व्यापारी व त्याच्या मित्रांनी गयावया करून हे प्रकरण मिटवून घेण्याची विनंती केली. यानंतर त्याच्याकडून जबरदस्तीने दोन लाख रुपये संशयितांनी उकळले आहेत. या प्रकरणातील राजू बोकेला पूर्वीच अटक करण्यात आली असून, त्याचे साथीदार व संबंधित महिलेचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत. दरम्यान, फलटण शहरात हनी ट्रॅपद्वारे अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा: यंदाचा आषाढी सोहळा पायी वारीच्या स्वरूपात असावा का ?

ब्लाॅग वाचा

loading image
go to top