esakal | आईला मारल्याने मुलाने केला युवकाचा खून; एकास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

आईला मारल्याने मुलाने केला युवकाचा खून; एकास अटक

sakal_logo
By
किरण बाेळे

फलटण शहर (जि. सातारा) : आईशी भांडण करून तिला मारहाण करणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना सस्तेवाडी (ता. फलटण) (sastewadi) येथील दाते वस्ती येथे घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी (phaltan police) एकास अटक (arrests) केली असून, एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. गणेश हणमंत सावंत (वय 35) असे खून झालेल्याचे नाव आहे. satara crime news phaltan youth mother arrests

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी, की गणेश सावंत (रा. दातेवस्ती, सस्तेवाडी) याने अविनाश मल्हारी सावंत यास शेळीचे दूध काढण्याकरिता बोलाविले होते; परंतु तेथे अविनाश हा गेला नाही. त्या कारणावरून गणेश सावंत याने अविनाशच्या आईशी भांडण करून तिला मारहाण केली. आईशी भांडण व तिला झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून बुधवारी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास दातेवस्ती येथे गणेश सावंत यास त्याच्या घरासमोर अविनाश मल्हारी सावंत (वय 23) व एक अल्पवयीन (दोघेही रा. दातेवस्ती) यांनी पाणी सोडण्याच्या लोखंडी पान्याने व सत्तुराने वार करत मारहाण केली.

हेही वाचा: `मम्मी पप्पांना चटके बसत आहेत`, अंत्यसंस्कारात सातव यांच्या चिमुकलीचा आक्रोश

या मारहाणीत गणेश सावंत याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी हजर झाले. तपास चक्रे वेगाने फिरवीत या प्रकरणातील संशयित अविनाश सावंत यास अटक केली, तर अन्य अल्पवयीन यास ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्पना हणमंत सावंत (वय 37) यांनी फिर्याद नोंदविली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत.

हेही वाचा: 'नरेंद्र मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत, असे वागत आहेत'

हेही वाचा: न लिहिलेली बातमी...

ब्लाॅग वाचण्यासाठी क्लिक करा

satara crime news phaltan youth mother arrests

loading image