esakal | गाेळीबार प्रकरणी इंदापूरसह, बारामतीचे युवक पोलिस कोठडीत
sakal

बोलून बातमी शोधा

news gun firing

गाेळीबार प्रकरणी इंदापूरसह, बारामतीचे युवक पोलिस कोठडीत

sakal_logo
By
अश्‍पाक पटेल

खंडाळा : (जि. सातारा) : खंडाळा तालुक्यातील तोंडल याठिकाणी वीर धरण परिसरात एकाने रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार (firing) केला आहे. एका पार्टीत मद्यपान करुन झालेला प्रकार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याप्रकरणी बारामती (baramati), खंडाळा (khandala), इंदापूर (indapur) येथील एकूण नऊ जणांना शिरवळ पोलिसांनी (shirwal Police) अटक केली आहे. संबंधितांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (satara-crime-news-police-arrested-nine-youths-firing-near-veer-dam-shirwal)

तोंडल (ता. खंडाळा) येथे रविवारी सायंकाळी काही युवक वीर धरण परिसरात मद्यपान करत बसले होते. मद्यपान केल्यानंतर नशेत असणाऱ्या युवकांपैकी किरण देविदास निगडे (वय 45, रा. गुळुंचे, ता.पुरंदर) याने स्वतःकडे असलेले रिव्हॉल्व्हर काढत हवेत गोळीबार केला. यानंतर त्याने सोबत असणाऱ्या योगेश रणवरेला रिव्हॉल्व्हर देत आणखी एक गोळी हवेत झाडण्यास सांगितले. यानुसार योगेशने दुसऱ्यांदा हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसर दणाणला. याची माहिती मिळताच शिरवळ पोलिस त्याठिकाणी दाखल झाले.

हेही वाचा: मराठ्यांच्या 'आरक्षण' लढ्यासाठी उदयनराजे, संभाजीराजेंना एकत्र आणणार; नरेंद्र पाटलांची ग्वाही

पोलिसांनी किरण देविदास निगडे (वय 46, रा. गुळुंचे, ता.पुरंदर, जि.पुणे), सूर्यकांत चंद्रकांत साळुंखे (वय 28, रा. कानिफनाथवस्ती, भादे, ता. खंडाळा), नवनाथ बबन गाडे (वय 34, रा. चोपडज, पोस्ट करंजे, ता. बारामती, जि.पुणे), माधव अरविंद जगताप (वय 32, रा. वाकी, पोस्ट करंजे, ता. बारामती, जि.पुणे), तात्याराम अर्जुन बनसोडे (वय 38, रा. अंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे), विजय ज्ञानदेव साळुंखे (वय 39, रा. चोपडज (सोमेश्वर), पोस्ट करंजे, ता. बारामती, जि. पुणे), योगेश प्रकाश रणवरे (वय 42, रा. राख, ता. पुरंदर, जि. पुणे), वसंत नामदेव पवार (वय 47, रा.कोळविहिरे, ता. पुरंदर, जि. पुणे), अरविंद घनशाम बोदेले (वय 41, सध्या रा. लवथळेश्वर-जेजुरी, ता. पुरंदर, जि.पुणे, मूळ रा. भिवापूर, जि.नागपूर) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक रिव्हॉल्व्हर, आठ मोबाईल, दोन कार, एक दुचाकी, दारूच्या बाटल्या असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत रिव्हॉल्व्हर निगडे याचे असल्याचे समोर आले असून, त्याचा परवानाही त्याच्याकडे आहे. तो परवाना नूतनीकरण करणे आवश्‍यक असतानाही निगडेने केलेला नव्हता.

Court

Court

याप्रकरणी हवालदार मदन वरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किरण निगडे याच्यासह नऊ जणांविरुध्द शिरवळ पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.

ब्लाॅग वाचा

loading image
go to top