esakal | साता-यातील हाॅटेलवर पाेलिसांचा छापा
sakal

बोलून बातमी शोधा

police officer

साता-यातील हाॅटेलवर पाेलिसांचा छापा

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन खासगी प्रवासी वाहतुकदारांवर आज (गुरुवार) प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठाेठावण्यात आला आहे. याबराेबरच हॉटेल मलबार या ठिकाणी संबंधित वाहने पार्सल घेत असल्याचे निदर्शनास आल्याने हॉटेल मलबारवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित हाॅटेलच्या मालकास दहा हजारांचा दंड करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने झाली. ही कारावाई पोलिस निरीक्षक सजन हांकरे, तहसीलदार आशा होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार घाडगे, तहसील कार्यालय सर्कल लिंबे आणि त्यांचे समवेतच्या कर्मचा-यांनी केली आहे. या कारवाईत एकूण तीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा: यंदाचा आषाढी सोहळा पायी वारीच्या स्वरूपात असावा का ?

सातारा जिल्ह्यात एक जून पर्यंत कडक लाॅकडाउन करण्यात आले आहे. केवळ मेडिकल, आराेग्यविषयक दुकाने सुरु आहेत. विनाकारण बाहेर फिरणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे.

पाेलिस, आराेग्य यंत्रणा यांच्या माध्यमातून विनाकारण फिरणा-यांची काेराेना चाचणी करण्यात येत आहे. त्यातून नुकतेच 20 बाधित सापडले हाेते. आज (गुरुवार) सकाळी एका हाॅटेलवर पाेलिसांनी कारावाई केली आहे. त्यातून तीन हजारांचा दंड वसूल केला आहे.

ब्लाॅग वाचा