esakal | धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime

धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून

sakal_logo
By
अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : नायगाव (ता. खंडाळा) येथे प्रशांत चन्नपा जामदार (मूळ रा. बिगदगुडेवाडी, ता. कल्याण, जि. बिदर, कर्नाटक) या आठ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या मुलास डोक्‍यालाही मार लागला आहे. साेमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस पथक घटनास्थळी ठाण मांडून तपास करत होते.

याबाबत शिरवळ पोलिसांनी सांगितले, की नायगाव येथील प्रशांत गुजर यांच्याकडे कर्नाटक राज्यातील हे कुटुंब शेतावर कामाला होते. आईवडील शेतावर काम करत असताना फळाच्या पॅकिंगसाठी पेपरची रद्दी आणायला हा मुलगा घरी आला होता. जामदर यांच्या राहत्या घराशेजारील पपईच्या बागेत मुलाचा मृतदेह सायंकाळी आढळून आला. या घटनेचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

हेही वाचा: Maharastra Government (GR) : या आठवड्यातील राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय पहा एका क्लिकवर..

दरम्यान, हा प्रकार साेमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. यानंतर पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे, उपनिरीक्षक सागर अरगडे व वृषाली देसाईसह सर्व पोलिस कर्मचारी व गुन्हे अन्वेषणचे धुमाळ, तसेच ठसे तज्ज्ञ येथे तत्काळ हजर झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची चौकशी पोलिस करत होते.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

loading image