esakal | विसापूरात दागिन्यांसह रोख रक्कम पळविली; चाैघांचा शाेध सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

विसापूरात दागिन्यांसह रोख रक्कम पळविली; चाैघांचा शाेध सुरु

sakal_logo
By
सलीम आत्तार

पुसेगाव (जि. सातारा) : विसापूर (ता. खटाव) (visapur) गावच्या हद्दीतील सावंत वस्ती येथे मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास 25 ते 30 वयोगटातील चार जणांनी मोहन जयसिंग सावंत यांना मारहाण करून त्यांच्या शेतातील घरातून 7300 रुपये व एक लाख 54 हजार रुपयांचे दागिने (gold stolen) असे एकूण एक लाख 61 हजार 300 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. (satara-crime-news-theft-in-visapur)

याबाबत पोलिसांनी सांगितले, मंगळवारी (ता. 25) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास विसापूरच्या हद्दीतील सावंत वस्ती येथे मोहन जयसिंग सावंत हे आपल्या शेतातील राहत्या घरात झोपले असता 25 ते 30 वयोगटातील चार अनोळखींनी त्यांना मारहाण करून त्यांच्या बॅंकेच्या पुस्तकात ठेवलेली रोख रक्कम 5300 रुपये व त्यांच्या पत्नीकडील रोख 2000 रुपये, तसेच एक लाख 56 हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. या चौघांपैकी एकाने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये त्यांची पत्नी पद्मावती यांच्या गळ्यातील चार हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले, 90 हजारांचे कपाटात ठेवलेले सोन्याचे दोन तोळ्यांचे गंठण, 20 हजारांची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 40 हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची चेन यांचा समावेश आहे.

हेही वाचा: Don't Worry! साताऱ्यात 4 हजार 900 डोस उपलब्ध; जिल्ह्यातील 'या' केंद्रांवर मिळणार लस

याबाबतची फिर्याद मोहन सावंत यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बी. बी. लोंढे करत आहेत.

ब्लाॅग वाचा