
भुईंज येथे बंद असणारी तीन घरे फोडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
भुईंज (जि. सातारा) : येथे सायंकाळच्या सुमारास बंद असणारी तीन घरे फोडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी लता अनिल वाईकर व अनंत महादेव चिकणे यांनी भुईंज पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, लता वाईकर या सकाळी कामानिमित्त भोर येथे गेल्या होत्या. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या घरी आल्या. त्या वेळी त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातील एक लाख तीन हजार पाचशे रुपये रोख व सोने-चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख 60 हजारांचा एवज लंपास केला.
निवडणुकीसाठी 100 कोटी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ; भाजपची राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ऑफर
बस स्थानक ते कर्मवीर विद्यालय रस्त्यावर महामार्गानजीक असणाऱ्या अनंत महादेव चिकणे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 35 हजार रुपये रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने मिळून सुमारे 62 हजारांचा एवज लंपास केला आहे. या दोन्ही चोऱ्या सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाल्या आहेत. सायंकाळच्या वेळेत या चोऱ्या झाल्याने भुईंज गावात खळबळ उडाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे तपास करत आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे