Satara Crime : दरोड्यातील फरारी तडीपार गुंड जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime : दरोड्यातील फरारी तडीपार गुंड जेरबंद

Satara Crime : दरोड्यातील फरारी तडीपार गुंड जेरबंद

दहिवडी : तब्बल नऊ गुन्हे दाखल असलेला, तसेच फलटण येथील दरोड्याच्या गुन्ह्यात फरारी असलेला तडीपार गुंड दीपक नामदेव मसुगडे (वय २२, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) याला तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी जेरबंद केले.

हेही वाचा: 'काशी-मथुरा बाकी है!' मथुरेतील मशिदीत बसवणार श्रीकृष्णाची मुर्ती; हिंदू महासभेची धमकी

दीपक मसुगडे गुंडाची पुसेगाव, दहिवडी, फलटण, कोरेगाव या परिसरात मोठी दहशत होती. त्याच्यावर जबरी चोरीचे ५, घरफोडीचा १, खुनाचा प्रयत्न १, गर्दी मारामारी १ व चोरी १ असे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिस अधीक्षकांनी माण, खटाव, कोरेगाव व फलटण या चार तालुक्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार केले होते. तडीपार कालावधीतील फलटण पोलिस ठाणे हद्दीत येथील एक दरोड्याचा गुन्ह्यात सुद्धा तो फरारी होता.

तडीपार कालावधीत १५ नोव्हेंबर रोजी तडीपार आदेशाचे उल्लंघन करून तो सत्रेवाडी (ता. माण) येथे आल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याच्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा: राज्यात रुग्णसंख्येत अंशत: वाढ; तर 32 रुग्णांचा मृत्यू

ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक तासगावकर, सहायक पोलिस फौजदार अशोक हजारे, पोलिस हवालदार संजय केंगले, पोलिस नाईक रवींद्र बनसोडे व प्रमोद कदम यांनी ही कारवाई केली.

loading image
go to top