'काशी-मथुरा बाकी है!' मथुरेतील मशिदीत बसवणार श्रीकृष्णाची मुर्ती; हिंदू महासभेची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'काशी-मथुरा बाकी है!' मथुरेतील मशिदीत बसवणार श्रीकृष्णाची मुर्ती; हिंदू महासभेची धमकी

'काशी-मथुरा बाकी है!' मथुरेतील मशिदीत बसवणार श्रीकृष्णाची मुर्ती; हिंदू महासभेची धमकी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : 'अयोध्या तो केवल झाकी है, काशी-मथुरा बाकी है' ही घोषणा होती 1990-92 सालातल्या भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांची! बाबरी विध्वंसावेळी वातावरण तापवण्यासाठी आणि अधिकाधिक हिंदूंना आपल्यासोबत घेण्यासाठी तेंव्हा भाजपने हा संकल्प सोडला होता. निव्वळ अयोध्येतील राम मंदिरच नव्हे तर काशी-मथुरेतील मशीदी सुद्धा उद्ध्वस्त केल्या जातील, आणि त्याठिकाणी हिंदूंची मंदिरं उभी केली जातील, असा संकल्प भाजप आणि हिंदूत्ववाद्यांचा होता. त्याच संकल्पानुसार वाटचाल होत असल्याचं दिसत आहे. कारण आता अखिल भारत हिंदू महासभेने भगवान श्रीकृष्णाची मुर्तीची मथुरेतील मशिदीत प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.

हेही वाचा: त्रिपुरा हिंसाचार; 36 आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचे सायबर पोलिसांचे निर्देश

मथुरेतील प्रमुख मंदिराजवळ असणाऱ्या मशीद हेच भगवान श्रीकृष्णाचं खरं जन्मस्थान असल्याचा त्यांचा दावा आहे. याबाबत बोलताना हिंदू महासभेच्या प्रमुख नेत्या राजश्री चौधरी यांनी म्हटलंय की, 6 डिसेंबर रोजी जागेच्या शुद्धीकरणासाठी 'महा जलाभिषेक' करुन झाल्यानंतर या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. अयोध्येतील बाबरी मशीदीचा ढाचा देखील 6 डिसेंबर रोजीच 1992 साली हिंदूत्ववादी संघटनांकडून उद्ध्वस्त करण्यात आला होता. श्रीकृष्णाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी देखील जाणीवपूर्वक ही तारीख निवडण्यात आल्याचा कयास आहे.

हेही वाचा: 'कमांडर-इन-थीफ'वरील मानहानी खटला; राहुल गांधींची मुंबई हायकोर्टात धाव

शाही इदगाहच्या आत विधी करण्याची महासभेने धमकी दिली आहे. एकीकडे स्थानिक न्यायालये कटरा केशव देव मंदिराजवळील 17 व्या शतकातील मशीद “हटवण्याची” मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करत आहेत. तर दुसरीकडे हिंदू महासभेने हा इशारा दिला आहे. मात्र, हिंदू महासभेच्या प्रमुख राजश्री चौधरी यांनी या तारखेचा संबंध 1992 च्या बाबरी विध्वंसांशी असल्याचे नाकारले आहे. मात्र, या शुद्धीकरणाच्या महा जलाभिषेकासाठी पवित्र नद्यांमधून पाणी आणलं जाईल, असं त्यांनी म्हटलंय. सद्या आपल्याला पुरेसे राजकीय स्वातंत्र्य आहे मात्र, आपण अद्याप धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य प्राप्त करु शकलो नसल्याचं विधान त्यांनी केलंय.

loading image
go to top