सातारा : खोडशीत गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara crime update Two arrested for smuggling Cannabis

सातारा : खोडशीत गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

कऱ्हा़ड : महामार्गावरून गांजाची विक्री करणाऱ्या दोन सख्ख्याभावांना योथील पोलिसांनी नाकाबंदी करून अटक केली. खोडशी (ता. कऱ्हाड) येथे काल दुपारी कारवाई झाली. त्यात ४३ हजार ५६० रूपयांचा आठ किलो ९०० ग्रमचा गांजासह चारचाकी कारही जप्त केली आहे. एकनाथ सदाशिव चव्हाण 9वय 37) व बापू सदाशिव चव्हाण (22, दोघे रा. बीड, जि, बीड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. पोलिस उपाधीक्षक कार्यालय व शहर पोलिसांनी संयुक्ता कारवाई केली.

पोलिसांनी सांगितले की, बीड परिसरातून एका कारमधून (एम. एच. 12 - जेझेड - 654) गांजाची वाहतूक सुरू आहे. तो कऱ्हाड परिसरात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील यांना मिळाली. त्यांनी त्याच्या तपासासाठी पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. शहर व पोलिस उपाक्षीक कार्यालय अशी दोन पथके तयार करून खोडसी परिसरात सापळा रचण्यात आला. महामार्गावरून पोलिसांनी अपेक्षीत असलेले त्याच क्रमांकाची कार येताच पोलिस निरिक्षक पाटील यांच्या पथकाने ती कार ताब्यात घेवून त्या कारची झडती घेतली. त्यावेळी त्या कारमध्ये गांजा आढळून आला. पोलिस निरिक्षकस पाटील, फौजदार राजेंद्र पुजारी, हवालदार सागर बर्गे, प्रवीण पवार, दीपक कोळी यांच्या पथकाने त्या कारसहीत दोघांनाताब्यात गेतले. कारमध्ये सापडलेला गांजा आठ किलो 900 ग्रम इतका होता. त्याचा पंचनामा करून गांजाहीसहीत कारही पोलिसांनी जप्त केली आहे. त्या दोघांनाही अटक आहे.