Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Satara DCC Bank Election Faces Latur Pattern Tenure Twist: लातूर पॅटर्नमुळे दशकभर सत्तेत असलेल्या संचालकांचे राजकीय भवितव्य धोक्यात; आरबीआयच्या निकषांमुळे जुन्या दिग्गजांना विश्रांती देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा जोरात
Satara DCC Bank Election 2026 Ten Year Director Rule Brings Focus On Long Serving Directors And New Political Equations

Satara DCC Bank Election 2026 Ten Year Director Rule Brings Focus On Long Serving Directors And New Political Equations

sakal

Updated on

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या २५ सप्टेंबरला अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे विविध पक्षांतील इच्छुकांचे लक्ष याकडे लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत एक मोठा तांत्रिक आणि राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक राहिलेल्या सहकारमंत्र्यांसह एका संचालकाला रिझर्व्ह बँकेने नुकतेच अपात्र ठरवले आहे. हाच ‘लातूर पॅटर्न’ साताऱ्यात लागू झाल्यास अनेक वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या दिग्गजांची मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे यावेळेस जुन्या चेहऱ्यांपैकी किती जण रिंगणात उरणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com