सातारा : डेंग्युच्या पार्श्वभुमीवर घरोघरी सर्व्हे

घरातील पाणी साठवण्याची भांडी, फ्रीज स्वच्छतेचे आवाहन
डेंग्युच्या पार्श्वभुमीवर घरोघरी सर्व्हे
डेंग्युच्या पार्श्वभुमीवर घरोघरी सर्व्हेsakal

कऱ्हाड : कऱ्हाड शहरासह तालुक्यात मलेरिया विभागामार्फत डेंग्यूचे सर्व्हेक्षण सुरु आहे. कंटेनर सर्व्हेक्षणामध्ये डेंग्यू अळ्या आढळलेली भांडी रिकामी करुन ती कोरडी करण्याची कार्यवाही सुरु आहे. नागरीकांनी पाणी साठवण्याची भांडी कोरडी, स्वच्छ करावी, फ्रिज, कुलरमधील पाणी वेळोवेळी रिकामी करावे, परिसरात पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य पर्यवेक्षक महेश पिसाळ यांनी केले आहे.

डेंग्युच्या पार्श्वभुमीवर घरोघरी सर्व्हे
सातारा : याचिकेमुळे जिल्हा बॅंकेची मतदार यादी लटकली

सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड शहरासह तालुक्यामध्ये कोविड १९ आजारामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष झाले होते. सध्या नॉन कोव्हीड आजारांनी डोके वर काढले आहे. कऱ्हाड तालुक्यात डेंग्यू, चिकुगुण्याचे आत्तापर्यंत दहा बळी गेले आहेत. सध्यस्थितीत सर्वच साथरोग नियंत्रणात आहेत. त्यासाठी गावोगावी जनजागृती चालू आहे. कऱ्हाड शहरामध्ये मलेरिया विभागाकडील तीन कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्व्हे सुरू आहे. कंटेनर सर्व्हेक्षणात डेंग्यू अळी आढळलेली भांडी रिकामी करण्यात येत आहेत. नागरीकांनी घरातील पाणीसाठे आठवड्यांतून एकदा स्वच्छ करावे. फ्रिज कुलर मधील पाणी वेळोवेळी रिकामे करावे. घराच्या आजुबाजूला तसेच नवीन इमारतीच्या ठिकाणी पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.

पाणीसाठे आढळल्यास त्वरीत पालिका, आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालयास कळवावे. त्यामुळे डासांचा वेळीच बंदोबस्त होऊन डेंग्यू, चिकुणगुण्या, हिवताप उद्भवणार नाही असे आवाहनही पिसाळ यांनी केले आहे. जिल्हा हिवताप अधिकारी सौ. जंगम, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्कीय अधिक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांचे सुचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल कोरबु, मुख्याधिकारी रमाकांत डाके, तालुका विस्तार अधिकारी आनंदराव कोळी, आरोग्य पर्यवेक्षक महेश पिसाळ यांच्या सहकार्याने उज्वल खेडकर, प्रकाश भोसले, अरुण काळे किटकजन्य आजाराबाबत सर्व्हेक्षण व जनजागृती करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com