वनसंपदेसह मुली जपण्याचा सोनगावात निर्धार, मुलगी जन्मताच लावणार दहा फळझाडे

Satara
Satara
Updated on

सातारा (जि. सातारा) : ऱ्हास होत चाललेली वनसंपदा, तसेच मुलींचा घटणारा जन्मदर हा समस्त समाजाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न आहे. ही समस्या किमान कमी व्हावी, यासाठी सातारा तालुक्‍यातील सोनगाव संमत निंब गाव खारीचा वाटा उचलत असून, गावात ज्या कुटुंबात मुलीचा जन्म होईल त्या कुटुंबाला लावण्यासाठी दहा फळरोपे दिली जात आहेत. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गावातील मुलगी झालेल्या 36 दांपत्यांना प्रत्येकी दहा फळरोपांचे वाटप करण्यात आले. 

सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून, तसेच स्वतः ग्रामपंचायतीने आपल्या गावाचा परिसर वनसंपदेने समृद्ध व्हावा, त्याबरोबरच मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी आजवर भरीव असे प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाची कन्या वन समृद्धी योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबात मुलीचा जन्म होईल, त्या कुटुंबाला विविध प्रकारची दहा फळरोपे लावून त्यांची जपणूक करण्यासाठी दिली जातात. सन 2017 पासून सोनगाव संमत निंबमध्ये 36 मुलींचा जन्म झाला आहे. त्या 36 दांपत्यांना नुकतेच प्रत्येकी दहा फळरोपांचे वाटप करण्यात आले. 

या वेळी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वनरक्षक डी. ए. कदम, एस. पी. जाधव यांनी कन्या वन समृद्धी योजनेची माहिती सविस्तर दिली. मुलीचा जन्मदर वाढावा, गावाच्या परिसरामध्ये वन संपदा वाढावी, सर्व नागरिकांमध्ये पर्यावरण प्रेम वाढावे, यासाठी ही योजना राबवली जात असून, ग्रामपंचायतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. 

कार्यक्रमास सरपंच संदीप सुतार, उपसरपंच सर्जेराव शिंदे, सदस्य प्रकाश शिंदे, संतोष शिंदे, सोनाली सोनटक्के, अनिता फडतरे, सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक कदम, जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. ग्रामसेवक एस. एम. यादव यांनी आभार मानले. 

(संपादन : पांडुरंग बर्गे)  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com