Satara News : विकास सोसायट्या होणार ऑनलाइन

केंद्राचा निर्णय : आर्थिक मदतीबरोबरच घोटाळे रोखण्यास मदत, जिल्ह्यातील ९५४ सोसायट्यांची मागवली माहिती
Development societies online Service
Development societies online Servicesakal
Updated on

सातारा : संगणकीकरणासोबतच एकच सॉफ्टवेअर वापरून देशभरातील विकास सेवा सोसायट्या ऑनलाइन करण्यात येणार आहेत. त्याव्दारे केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांना आर्थिक मदत देणे सोपे व सोईचे व्हावे, सोसायट्यांतील आर्थिक घोटाळ्यांना चाप बसावा, हा केंद्र सरकारचा उद्देश आहे. जिल्ह्यातील ९५४ सोसायट्या या माध्यमातून ऑनलाइन जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे त्यांचा कारभारही ऑनलाइन पाहणे शक्य होणार आहे.

विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासन व नाबार्डच्या विविध योजनांतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. विविध केंद्राच्या योजनांचाही लाभ दिला जातो. पण, काही सोसायट्या या आर्थिक अडचणीत असल्याने त्यांची नेमकी परिस्थिती समजत नाही. त्यामुळे देशभरातील सर्व विकास सेवा सोसायट्या एकाच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाइन जोडल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ९५४ विकास सेवा सोसायट्यांचे नवीन संगणक सॉफ्टवेअर देऊन ऑनलाइन जोडले जाणार आहे.

यापूर्वी संगणकीकृत झालेल्या सोसायट्यांचे सॉफ्टवेअर नव्या सॉफ्टवेअरशी मॅच होणार का? हा प्रश्न असल्याने सर्वच सोसायट्यांचा यामध्ये समावेश करून घेण्याबाबतचे पत्र जिल्हा उपनिबंधकांनी शासनाला दिले आहे. पण, ज्या सोसायट्या आर्थिक अडचणीत आहेत, त्यांचा समावेश होणार नाही. चांगल्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम सोसायट्यांचा यामध्ये समावेश होणार आहे.

या ऑनलाइन जोडणीमुळे सर्व सोसायट्यांची माहिती शेतकऱ्यांना संगणकावर पाहायला मिळणार आहे. तसेच त्यांची नेमकी आर्थिक परिस्थितीही समजण्यास मदत होणार आहे. सोसायट्यांत होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहार, घोटाळ्यांनाही यामुळे चाप बसणार आहे. यासोबतच एकाच वेळी सर्व सोसायट्यांना केंद्र शासन, राज्य शासन व नाबार्डकडून थेट आर्थिक मदत करणे, विविध योजनांतून लाभ देणे, व्याज सवलतीसह इतर योजनांचा लाभ देण्यासही उपयुक्त ठरणार आहे. सध्या केंद्र सरकारने सर्व सोसायट्यांची माहिती मागवली आहे. यात जिल्ह्यातील सर्व ९५४ सोसायट्यांचा समावेश होण्यासाठी जिल्हा उपनिबंधक व जिल्हा बॅंकेचे प्रयत्न सुरू आहेत.

देशभरातील सोसायट्या ऑनलाइन होत आहेत. यातून बॅंकांप्रमाणे सोसायट्यांचे व्यवहार ऑनलाइन दिसणार आहेत. यातून गैरव्यवहाराला आळा बसेल, तसेच सोप्या पद्धतीने हाताळणी होऊन संस्थांची कार्यक्षमता वाढणार आहे. पहिल्या टप्प्यात ६३ हजार विकास सेवा सोसायट्या ऑनलाइन होणार आहेत. देशभरात ९५ हजार विकास सेवा संस्था आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व संस्थांचे संगणकीकरण होऊन त्या ऑनलाइन होणार आहेत.

- डॉ. राजेंद्र सरकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com