ब्रेकिंग : तारळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 12 August 2020

तारळी नदीकाठ लगत असलेल्या गावांतील ग्रामस्थांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये.
 

सातारा : तारळी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून धणामधील पाणीसाठा  सांडव्यावरुन वाहण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्याच्या स्थितीत आहे. आज (बुधवार, ता. 12) सकाळी आठ वाजता एकूण पाणीसाठा 71.25 टक्के झालेला असुन पाणीपातळी 702.15 मीटर आहे. धरणामधील पाणीसाठा सांडावा पातळीपर्यंत (म्हणजेच 706.30 मी.) पोहोचल्यानंतर कोणत्याही क्षणी सुमारे 2000 क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रामध्ये सुरु होणार आहे. 

परिणामी धरणाच्या खालील बाजूस तारळी नदीमधील पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. अशी स्थिती येथुन पुढे पर्जन्य कालावधीमध्ये केव्हाही उद्भवू शकते. त्यामुळे तारळी नदीकाठ लगत असलेल्या गावांतील ग्रामस्थांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये. तसेच नदीकाठालगत असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी, डिझेल इंजिन अथवा तत्सम सामुग्री आणि पशुधन सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता कण्हेर कालावे विभाग क्र. 2, करवडी (कराड) यांनी दिल्या आहेत. 

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी वाढली

कोयना धरणात आज (बुधवार) 71.69 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 71.60  इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 59 नवजा येथे 75  व महाबळेश्वर येथे 66  मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 7.22 (60.77), धोम -बलकवडी- 3.36 (84.79), कण्हेर – 7.12 (74.18), उरमोडी – 8.28 (85.79), तारळी- 4.16 (71.21), निरा-देवघर 6.64 (56.61), भाटघर- 16.34 (69.53), वीर – 8.86 (94.20).

ही पालिका लॉकडाउन; कर्मचारी क्‍वारंटाइन, कामांचे काय? 

गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी  6.93 मिली मीटर पाऊस

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  6.93 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा 7.28  (516.28)  मिली मीटर, जावली 12.13 (908.03), पाटण – 16.18 (870.82), कराड – 2.00 (400.38), कोरेगाव – 0.33 (352.27), खटाव – 0.27 (306.82), माण – 0.00 (277.86), फलटण – 0.00 (267.62) , खंडाळा – 0.55  (311.50), वाई – 5.29 (488.69), महाबळेश्वर – 55.43 (3132.18)  याप्रमाणे आजपर्यंत एकूण  7832.44  तर सरासरी. 712.04 पावसाची  नोंद झाली आहे.

ठाकरे सरकार : लग्नाला परवानगी; धार्मिक कार्यक्रमांना का नाही? ज्येष्ठ किर्तनकार उवाच 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara District Administration Messeage For Tarli Villagers