Satara District Bank Chairman : 'अध्यक्ष भाजपचाच होणार, नाहीतर स्वबळावर लढणार'; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने महायुतीसमोर नवी कोंडी? राजकीय संघर्ष पेटणार?

Jaykumar Gore BJP claim on Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपने दावा केला आहे. जयकुमार गोरेंच्या भूमिकेमुळे महायुतीत संघर्षाची शक्यता वाढली असून, सहकार क्षेत्रातील सत्तासमीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत.
Jaykumar Gore BJP claim on Satara District Bank

Jaykumar Gore BJP claim on Satara District Bank

esakal

Updated on: 

कराड : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या संघर्षानंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीत नव्या राजकीय संघर्षाचे संकेत मिळू लागले आहेत. सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचाच असेल, अशी ठाम भूमिका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मांडल्याने महायुतीतील मित्रपक्षांसमोर नवी राजकीय कोंडी निर्माण (Satara District Central Cooperative Bank chairman election) झाली. त्यातच युती झाली तर एकत्रित, अन्यथा भाजप स्वतंत्र लढेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिल्याने साताऱ्यातील महायुतीच्या एकजुटीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकाराच्या सत्ताकेंद्रावर वर्चस्व कोणाचे राहणार, याची उत्सुकता लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com