

Satara DCC Bank Election 2026 Nomination Forms From September 25 Voting On November 1 And Counting On November 3
sakal
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेने निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांनी जाहीर केला आहे. बँकेच्या एकूण २१ संचालकांच्या जागांसाठी येत्या शुक्रवारपासून ते एक ऑक्टोबरपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. एक नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया होऊन तीन नोव्हेंबरला निकाल घोषित केला जाणार आहे.