

Medha Crime News Three Booked for Assaulting Shiv Sena Panchayat Samiti Member Over Firecracker Dispute in Satara District
esakal
कास : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे विजयी झाल्यानंतर वरोशी (ता. जावळी) येथे काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान फटाके फोडण्यावरून वाद निर्माण झाला. घरात तीन महिन्यांची लहान मुलगी असल्याने फटाके फोडू नका,असे सांगितल्याचा राग मनात धरून शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य अतिश कदम यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.