

Satara District Bank Election
esakal
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून भाजपमध्ये सुरू असलेली नाराजी आणि महायुतीतील राजकीय घडामोडींवर भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. जिल्हा पातळीवर काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात. मात्र, त्याचा अर्थ महायुतीमध्ये वाद सुरू आहेत, असा होत नाही. अशा मतभेदांचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.