Satara News : सातारा जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना १४ टक्के पगारवाढ; संचालक मंडळाचा निर्णय

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बँक एम्प्लाईज युनियनमध्ये बँक सेवकांकरिता सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा करार केला.
satara district central bank director body
satara district central bank director bodysakal
Updated on

सातारा - सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बँक एम्प्लाईज युनियनमध्ये बँक सेवकांकरिता सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा करार शनिवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आला आहे. या करारानुसार १४ टक्क्यांपर्यंत पगारवाढ झाली आहे. एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ अखेर पाच वर्षे मुदतीचा पगारवाढीचा करार करण्यात आला. सुधारित वेतनश्रेणी एक एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहे. याचा बँकेवर साधारणपणे वार्षिक १४.५० कोटींचा बोजा पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com