Satara District Bank Election Result
esakal
कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी गटातून अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर हे भाजपचे कराड दक्षिण अध्यक्ष धनंजय पाटील यांच्यावर 55 मतांनी मात करून विजयी झाले (Udaysinh Patil Karad Election Victory) आहेत. अॅड. उंडाळकर यांना 100 तर, पाटील यांना 45 मते पडली आहेत. उंडाळकर यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाच्या उधळणीत जल्लोष सुरू केला आहे.