Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

Satara District Bank Election Triggers Political Mobilisation: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कऱ्हाड दौऱ्यात ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याशी बंदद्वार चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
Satara District Bank

Satara District Bank

esakal

Updated on

कऱ्हाड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यातील राजकीय पटावर हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या सत्ताकारणावर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांकडून जुळवाजुळव सुरू असतानाच आज झालेल्या एका राजकीय भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कऱ्हाड दौऱ्यावर असताना त्यांनी ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याशी कमरा बंद चर्चा केली. त्यामुळे या भेटीचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com