सातारा : छत्रपती संभाजी स्मारकास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सातारा : छत्रपती संभाजी स्मारकास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

कऱ्हाड : छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक येथील भेदा चौकात उभारण्यासाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी परवानगी दिली आहे. याबाबतचे पत्र स्मारक समितीला देण्यात आले आहे. स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

स्मारक समितीचे अध्यक्ष जयंत पाटील, सचिव रणजित पाटील, सदस्य अॅड. दीपक थोरात, प्रतापराव साळुंखे, प्रताप इंगवले, स्वाती पिसाळ, विद्या मोरे, भूषण जगताप यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. समितीच्या वतीने स्मारकासाठी पालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर पालिकेने १६ फेब्रुवारी २०२२ ठराव करून भेदा चौकातील जागा देण्यास मंजुरी दिली. त्यानंतर गेले सात महिने विविध शासकीय विभागांच्या परवानग्या मिळवल्या आहेत.

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी १६ सप्टेंबरला येथील नियोजित स्मारकाच्या उभारणीस मंजुरी दिलेली आहे. याबाबतचे पत्र स्मारक समितीला देण्यात आले. स्मारकास मंजुरी मिळाल्याने प्रत्यक्ष स्मारक उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. हे स्मारक महाराष्ट्रातील भव्य स्मारक होईल. शहराच्या वैभवातही भर पडेल. स्मारक ५५ फुटांचे असून, यात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, संग्रहालय, स्पर्धा परीक्षार्थींसाठी अभ्यासिका, ग्रंथालय असेल. सुमारे सात कोटींचा हा प्रकल्प असून, तीन टप्प्यांत या स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे.