गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा! जिल्हाधिकारी शेखर सिंह

Shekhar Singh
Shekhar SinghSystem
Updated on
Summary

जिल्हाधिकारी सिंह म्‍हणाले, यंदाच्‍या गणेशोत्‍सवात सार्वजनिक गणेश मंडळांची मूर्ती चार फूट उंचीची व घरगुती गणेशमूर्ती दोन फूट उंचीची असावी.

सातारा: कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव जिल्ह्यात साध्या पद्धतीने व पर्यावरण पूरक साजरा करण्‍याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गणेशोत्सवाबाबत बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Shekhar Singh
सातारा : भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडीची भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी

जिल्हाधिकारी सिंह म्‍हणाले, ‘‘यंदाच्‍या गणेशोत्‍सवात सार्वजनिक गणेश मंडळांची मूर्ती चार फूट उंचीची व घरगुती गणेशमूर्ती दोन फूट उंचीची असावी. नागरिकांनी, तसेच मंडळांनी पारंपरिक गणेशमूर्ती स्‍थापन्याऐवजी घरातील धातू, संगमरवराच्‍या मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो नागरिकांनी घरीच करावे. तसे विसर्जन घरी शक्य नसल्यास जवळच्‍या कृत्रिम विसर्जनस्थळी त्‍या मूर्तीचे विसर्जन करावे.’’

Shekhar Singh
सातारा : भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडीची भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी

जाहिराती, देखाव्‍यांमुळे गर्दी होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्‍यायची असून, मंडळांनी शक्‍यतो आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यावर भर देणे आवश्‍‍यक आहे. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम टाळत आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करावीत, तसेच इतर कारणासाठी मंडळात होणारी गर्दी टाळण्‍याचे आवाहनही श्री. सिंह यांनी बैठकीत केले. गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

Shekhar Singh
सातारा: जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात बिबट्या

गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक आदी समाजमाध्‍यमांद्वारे उपलब्‍ध करून द्यावे.

- शेखर सिंह, जिल्हाधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com