
सातारा : दर पाच वर्षांनी होणारी पशुगणना यंदा उशिरा का होईना अखेर सुरू झाली आहे. ही २१ वी पशुगणना पहिल्यादांच मोबाईल ॲपद्वारे सुरू झाली असून, १६ प्रकारच्या जनावरांची गणना यामध्ये केली जाणार आहे. या गणनेत गोवंश आणि म्हैसवर्गीय जनावरांना इअर टॅगिंग केले जाणार असून, त्यादृष्टीने जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे काम सुरू झाले आहे.