Satara Rain : सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; विजांच्या कडकडाटासह वादळी वारा, हवामान खात्याचा काय इशारा?

Satara Weather Update: वादळी वाऱ्यासह मेघगर्जना करत झालेल्‍या मुसळधार पावसावेळी शहराजवळील पॉवर हाउस येथील एक मोबाईल टॉवर कोसळला. कोसळलेल्‍या टॉवरमुळे एका चारचाकीचे नुकसान झाले असून, सुदैवाने त्‍यात कोणीही जखमी झाले नाही.
Dark clouds hover over Satara district as torrential rains and thunderstorm sweep through the region.
Dark clouds hover over Satara district as torrential rains and thunderstorm sweep through the region.Sakal
Updated on

सातारा : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. सातारा, म्हसवड, आरडगाव, औंध, पुसेसावळी व आनेवाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडे पडली, तर काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com