

Mission Sudhar In Satara Identifies 57000 Ineligible Ration Cards Food Grain Benefits Set To Be Stopped For Ineligible Users
sakal
सातारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच मिळावा, यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून ‘मिशन सुधार’ व राईटफूल टारगेटींग ऑफ बेनिफिशरिज ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शासनाने केलेल्या तपासणीत सातारा जिल्ह्यातील तब्बल ५७ हजार ३९१ शिधापत्रिका संशयास्पद व अपात्र आढळल्या आहेत. या सर्व अपात्र लाभार्थ्यांची नावे अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्यात येणार असून, त्यांचा धान्य पुरवठा तत्काळ बंद केला जाणार आहे.