Model Anganwadi : सातारा जिल्ह्यात आता बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मॉडेल अंगणवाडी; पहिला टप्पा होणार मेपर्यंत पूर्ण
Satara News : जिल्ह्यात एकूण चार हजार ५६२ अंगणवाड्या आहेत. त्यामधील तीन हजार ४४८ अंगणवाड्यांना प्रशासकीय स्वमालकीच्या इमारती असून, उर्वरित ९८ अंगणवाड्यांना मॉडेल अंगणवाडी करण्यात येणार आहेत.
सातारा : बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाड्या अधिक सक्षम व अद्ययावत होणार असून, यासाठी आता जिल्ह्यात मॉडेल अंगणवाडी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.