esakal | Rain Update : सातारा, महाबळेश्वर, पाटणात मुसळधार; जिल्ह्यात 9.2 MM पावसाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला चार ते पाच दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

Rain Update : सातारा, महाबळेश्वर, पाटणात मुसळधार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. पश्चिम मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. उर्वरित भागात पावसाचा जोर कमी आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत विदर्भात जोर वाढणार आहे. कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला चार ते पाच दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या (Meteorological Department) सूत्रांनी वर्तविला. जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज (मंगळवार) सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 9.2 मिली मीटर पाऊस पडला असून आत्तापर्यंत सरासरी 100 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. (Satara District Received An Average Rainfall Of 9.2 MM bam92)

जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आत्तापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिली मीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 7.5 (68.4) मि. मी., जावळी- 16.8 (107.8) मि.मी., पाटण-19.1 (122.5) मि.मी., कराड-7.4 (61.0) मि.मी., कोरेगाव-3.1 (75.0) मि.मी., खटाव-2.6 (38.2) मि.मी., माण- 1.6 (114.7) मि.मी., फलटण- 0.5 (64.7) मि.मी., खंडाळा- 1.1 (42.3) मि.मी., वाई-6.9 (102.1) मि.मी., महाबळेश्वर-56.1 (553.7) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा: कोयनेत जोरदार पाऊस; धरणाच्या पातळीत अडीच 'TMC'ने वाढ

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राची किनारपट्टी ते कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान कमी दाबाच्या पट्याची द्रोणीय स्थिती आहे. याशिवाय मध्य प्रदेशचा मध्य भाग ते दक्षिण तमिळनाडू ते विदर्भ, तेलंगाना आणि रायलसीमा परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच बंगाल उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र येत्या २३ जुलै रोजी सक्रिय होण्याचे संकेत आहेत.

Satara District Received An Average Rainfall Of 9.2 MM bam92

loading image